प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या गृहनिर्माण संस्थांची कामगिरी

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडल्यास इमारत प्रतिबंधित करण्याचा नियम पालिके ने के ला आहे. अशा सोसायटय़ांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र मायक्रोकं टेनमेंट झोन तयार करून सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्राचे नियम पाळायचे आहेत. याकरिता सोसायटय़ांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मुंबईत हजारो इमारती असून या नियमांचे काही ठिकाणी काटेकोर पालन के ले जाते आहे, तर काही ठिकाणी प्रचंड बेफिकिरी आणि वादावादीही होते आहे. मात्र मुंबईतील काही उच्चभ्रू सोसायटय़ांनी सामाजिक भान सांभाळून आपापल्या सोसायटय़ांमध्ये चोख नियोजन के ले आहे.

करोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढू लागल्यानंतर  विशेषत: इमारतीतील रुग्ण मोठय़ा संख्येने वाढू लागल्यामुळे इमारतीत प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने व पालिके ने या सोसायटय़ांवर टाकली.  या निर्णयाचे पडसाद गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये उमटू लागले आहेत. सोसायटी पदाधिकाऱ्यांनी या नियमावलीत लक्ष घालायचे की आपली कामे करायचे असाही प्रश्न विचारला जात आहे. मुंबईत अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅ मेरे नाहीत, पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नाहीत, अनेक इमारतीत तर लोक एकमेकांना ओळखतही नाहीत, भाडेकरू असतील तर त्यांच्याविषयी शेजाऱ्यांना काहीही माहिती नाही अशी वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे या नियमाबाबत संभ्रम होता. मात्र मुंबईतील काही उच्चभ्रू सोसायटय़ांनी या नियमाचे आपापल्या पातळीवर नियोजन के ले आहे. पालिके च्या नियमावलीत प्रत्येक सोसायटीने आपापल्या गरजेनुसार बदलही करून हे नियम अधिक व्यवहार्य केले आहेत.

‘प्रतिबंधित इमारतींची जबाबदारी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांवर असली तरी आमचे अधिकारी या इमारतीत जाऊन वरचेवर पाहणी करतात. आम्ही पोलिसांचीही मदत घेतो. काही इमारतींच्या बाहेर पोलीसही तैनात आहेत. तर काही ठिकाणी पोलीस गस्त घालून लक्ष ठेवत असतात,’ अशी माहिती डी विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार दिल्यामुळे उलट वादावादीचे प्रसंग टळल्याचे मत साहाय्यक आयुक्त वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिमचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी व्यक्त  के ले. पदाधिकाऱ्यांनी काही नियम सांगितले की लोक त्यांनाच हटकतात, मात्र आता कायद्यानेच अधिकार दिल्यामुळे त्यांना हे नियम पाळणे बंधनकारक झाले आहे.

बाहेरून येणाऱ्यांसाठी उद्वाहन राखीव

परळ येथील अशोका गार्डन या उच्चभ्रू सोसायटीत तब्बल ६०० हून अधिक सदस्य आहेत तर सुमारे २००० रहिवासी आहेत. या सोसायटीत सहा इमारती असून तब्बल ५०० सीसी टीव्ही कॅ मेरे आहेत. या इमारतीत गेल्या काही दिवसांपासून १२ रुग्ण सापडले आहेत. मात्र हे रुग्ण सहा इमारतींमध्ये विभागलेले आहेत. परंतु, तरीही या सोसायटीने प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या नियमांची अंमलबजावणी के ली आहे. बाहेरून येणारे सर्व सामान प्रवेशद्वारावर घ्यावे आणि मग ते सदस्यांना वितरित करण्यासाठी यंत्रणा उभारावी असा पालिके चा नवा नियम आहे. मात्र या सोसायटीत ६०० सदस्य असल्यामुळे एवढे लोक कोणत्याही प्रवेशद्वारावर जमले तर ते धोक्याचे ठरेल ही बाब सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिके च्या यंत्रणेच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे तात्पुरता बदल करून सोसायटीतील एक उद्वाहन हे बाहेरच्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सामान पोहोचवणाऱ्या व्यक्तीची तपासणी करूनच त्याला ठरावीक उद्वाहनाने पाठवले जाते व तो कुठेही न रेंगाळता पुन्हा बाहेर जाईल याची काळजी घेतली जाते, अशी माहिती सोसायटीचे पदाधिकारी गौतम देशपांडे यांनी दिली.

सदनिकांमधील दुरुस्तीची कामे थांबवली 

मलबार हिल येथील ‘इन्फिनिटी’ या उच्चभ्रू सोसायटीत ६० टक्के  सदनिकांमध्ये रहिवासी राहतात. तर ४० टक्के  सदनिका बंद आहेत. यात अंतर्गत दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र ही सगळी दुरुस्तीची कामे या काळात बंद ठेवण्यात आल्याची माहिती पदाधिकारी सुरेश देवरा यांनी दिली.

रुग्ण आढळल्यानंतर सर्वाच्या चाचण्या

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोड येथील ‘अ‍ॅम्बसी’ सोसायटीत ४७ सदनिका आहेत. या इमारतीत २० दिवसांपूर्वी तीन रुग्ण सापडले होते. यानंतर इमारतीतील व बाजूच्या इमारतीतील सर्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात घर कामगार, चालक यांच्याही चाचण्या के ल्या असता लक्षणे नसलेले १५ रुग्ण सापडले होते, अशी माहिती सोसायटीचे पदाधिकारी मुकु ल मेहरा यांनी दिली. त्यामुळे ही इमारत पूर्ण प्रतिबंधित के ली होती.  सुरुवातीला दोन दिवस लोक सहकार्य करीत नव्हते. मात्र हे आपल्यासाठी आवश्यक असल्याचे पटवून दिल्यानंतर लोकांनी सहकार्य के ल्याचेही त्यांनी सांगितले.

११८८ मुंबईतील एकूण सीलबंद इमारती

२७० अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम

२५० ग्रॅंटरोड, नानाचौक

१२७ लालबाग, परळ