29 September 2020

News Flash

देवरा- अहिरांचा कॅम्पा कोलावासियांना दिलासा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार मिलिंद देवरा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कायद्याच्या

| October 17, 2013 04:17 am

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार मिलिंद देवरा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कॅम्पा कोलातील घरे वाचविण्यासाठी शक्यतो सर्व मदत करू,असे आश्वासन दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
देवरा आणि अहिर यांनी बुधवारी वरळीत रहिवाशांची भेट घेतली. रहिवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर देवरा म्हणाले की, कोणतीही चूक नसताना या रहिवाशांना फटका बसला आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांच्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विकासकाकडून आवश्यक कागदपत्रे मिळालेली नाहीत. याचाही विचार केला जाईल़  या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या रहिवाशांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर बाबी विचारात घेतल्या जातील,
असे आश्वासन सचिन अहिर यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2013 4:17 am

Web Title: milind deora sachin ahir visits campa cola compound
टॅग Milind Deora
Next Stories
1 शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणीच चुकीची – रामदास आठवले
2 राजकीय नाटककार ..भाष्यकार
3 इमारतीवरून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू
Just Now!
X