19 September 2020

News Flash

अल्पवयीनांकडून मुलीचा विनयभंग

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना लुईसवाडी भागात शनिवारी घडली.

| December 22, 2014 02:19 am

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना लुईसवाडी भागात शनिवारी घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी पिडीत मुलीचा यापुर्वी दोनदा असाच पाठलाग केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
वागळे इस्टेट येथील हाजुरी परिसरात पिडीत मुलगी राहत असून ती दररोज हाजुरी येथून लुईसवाडी येथे क्लासला जाते. शनिवारी ती आणि तिची मैत्रिणी नेहमीप्रमाणे हाजुरी येथून क्लसला जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलांनी त्यांचा पाठलाग केला आणि लुईसवाडी भागात दोघींना अडविले. त्यानंतर दोघांपैकी एकाने पिडीत मुलीला बोलण्याचा आग्रह करत ऑसिड फेकण्याची धमकी दिली आणि तिचा विनयभंगही केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 2:19 am

Web Title: minor molested by minors
Next Stories
1 फोटो गॅलरीः लोकसत्ता लोकांकिकेचे मानकरी
2 ‘मेट्रो’वरून केंद्रांवर ताशेरे
3 अमिताभ क्षयरोग जनजागृतीचे काम करणार
Just Now!
X