News Flash

मीरा-भाईंदर: स्वयंघोषित धर्मगुरूचा १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पोलिसांनी धर्मगुरूला केलं अटक

(संग्रहित छायाचित्र)

महिला अत्याचारांच्या घटनांवर सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकाकडूनही या मुद्द्याकडे सरकारच लक्ष वेधलं जात आहे. अशातच मीरा-भाईंदरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मीरा-भाईंदर परिसरातील एका स्वयंघोषित धर्मगुरूनं एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे. मात्र, तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्याला असल्याच असल्याचं वृत्त आहे. वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर ही घटना उजेडात आली.

मीरारोड पूर्वेला असलेल्या महामार्गालगतच्या पय्याडे हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं पोलिसांना कळालं होतं. त्यानंतर पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेनं पय्याडे हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी हॉटेलमधून तीन मुलींची सुटका केली. यामध्ये एका १६ वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीनं धक्कादायक माहिती दिली.

मीरा-भाईंदर परिसरातील एक धर्मगुरू तिच्यावर बळजबरीनं लैंगिक अत्याचार करत होता. या पीडित मुलीची अधिक चौकशी करुन तिच्याकडून त्याबद्दलची सर्व माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर नया नगर पोलिसांनी या ६० वर्षीय धर्मगुरुला अटक केली. नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदे कलमानुसार या धर्मगुरुवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या धर्मगुरुची कसून चौकशी करत आहेत. यामधून आणखी काही माहिती समोर येणार का? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 4:10 pm

Web Title: mira bhayandar rape on 16 year old girl by religious leader in maharshtra bmh 90
Next Stories
1 “सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं”
2 “म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत!” आनंद महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं!
3 अबब! मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहार; तब्बल १००० कोटींना विकलं गेलं घर
Just Now!
X