भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर देशभरात नरेंद्र मोदींच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वेगवेगळया क्षेत्रातील प्रख्यात मंडळींच्या तोंडून मोदींची स्तुती गेल्या काही दिवसांत ऐकू आली. आता मिस एशिया पॅसिफिक ठरलेल्या भारताच्या सृष्टी राणानेही मोदींना पाठींबा दिला आहे.
नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा सृष्टीने व्यक्त केली आहे. एशिया पॅसिफिकचा किताब पटकाविल्यानंतर सृष्टी मुंबईत परतली. मुंबईच्या विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे.
सृष्टी राणा म्हणाली, नरेंद्र मोदी फार चांगले नेते आहेत, त्यामुळे तेच पंतप्रधान व्हावेत असे मला वाटते. मी त्यांना शुभेच्छा देते असेही ती म्हणाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 5, 2013 5:08 am