22 September 2020

News Flash

मंत्रालयातील उपसचिवाला बच्चू कडूंची मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या गावित यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत राहणारे अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंत्रालयामध्ये एका उपसचिवाला मारहाण केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या गावित यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनावेळी मंत्रालयातील तळमजल्यावर सर्व कर्मचारी एकत्र आले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या या कृतीचा कर्मचारी संघटनेकडून निषेध करण्यात आला. गावित यांना विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारा, असे उत्तर आपल्याला दिले. लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल, तर सामान्य माणसाचे काय, म्हणून आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिल्याचे बच्चू कडू यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 4:25 pm

Web Title: mls bacchu kadu beaten up under secretary in mantralya
Next Stories
1 चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणावरून गोगावलेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
2 धार्मिक कार्यक्रमात मुंडे बहीण-भावाचे शाब्दिक वार
3 शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा भार टाकू नये -अजित पवार
Just Now!
X