News Flash

“मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये”

"त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हाला काडीचीही गरज नाही"

मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका केली आहे. प्रवीण दरेकर आणि राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुनच अमेय खोपकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये. पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हाला काडीचीही गरज नाही”.

विचारधारा वैगेरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत असा टोलाही अमेय खोपकर यांनी लगावला आहे. “सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे,” अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

“राम कदम यांना जुने दिवस आता कदाचित आठवत नसतील. पण जेव्हा हे मनसेमध्ये होते, तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 1:08 pm

Web Title: mns amey khopar raj thackeray bjp pravin darekar ram kadam sgy 87
Next Stories
1 एसी लोकल नको रे बाबा!
2 मुंबई महापालिका अर्थसंकल्प : उत्पन्नात घट; खर्च भरमसाट!
3 BMC budget 2020-21 : मालमत्ता करात कचरा संकलन शुल्क
Just Now!
X