News Flash

शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा पाडवा मेळावा!

मनसेचा गुढीपाडवा मेळावा घेऊन पक्षामध्ये नवचैतन्याची तुतारी फुंकण्याचे राज ठाकरे यांनी ठरविले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर शिवाजी पार्क मैदानात मनसेचा गुढीपाडवा मेळावा घेऊन पक्षामध्ये नवचैतन्याची तुतारी फुंकण्याचे राज ठाकरे यांनी ठरविले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे झाली. या काळात झालेल्या लोकसभा-विधानसभेच्याच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मनसेला चमकदार कामगिरी बजावती आली नसल्याने, शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेमध्ये दाखल झालेले काहीजण स्वगृही परतले, तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये अलीकडे कमालीची मरगळ आली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनीच पाडवा मेळाव्याचा संकल्प सोडल्याने येत्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला नारळ शिवाजी पार्कवर फोडण्याचा मान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेला मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:32 am

Web Title: mns padwa melava on shivaji park
Next Stories
1 नगर, सोलापुरातील १०५३ गावांत दुष्काळ जाहीर
2 राज्य सरकारवर वीज कडाडली !
3 कर्करुग्णांसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Just Now!
X