07 March 2021

News Flash

राज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेने मुंबईतील दुचाकीस्वारांना छोटीशी भेट दिली आहे.

राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेने मुंबईतील दुचाकीस्वारांना छोटीशी भेट दिली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील काही निवडक पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांना मनसेकडून स्वस्तात पेट्रोलची विक्री करण्यात येत आहे. मुंबईतील काही ठराविक पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना आज प्रतिलिटर पेट्रोलवर ४ ते ९ रुपयांची सवलत मिळाली आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांना मनसेकडून प्रतिलिटर पेट्रोलवर नऊ रुपयांची सवलत देण्यात आली आहे. दिवसभरासाठी ही ऑफर नसून सकाळी नऊ ते दुपारी एक या मर्यादीत वेळेत स्वस्तात पेट्रोल मिळेल. मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती.

त्यामुळे मनसेने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वस्तात पेट्रोल वाटप करणार असल्याचे जाहीर केले होते. मुंबईमधील ३६ विधानसभा मतदार संघातील एका पेट्रोल पंपावर सूट मिळेल असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन जाहीर केले होते. मागच्या काही दिवसात सातत्याने पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.

आज पहिल्यांदा मला माझी पेट्रोलची टाकी फुल करण्याची संधी मिळाली आहे असे एका दुचाकीस्वाराने सांगितले. राज ठाकरें प्रमाणे मोदी सरकार सुद्धा पेट्रोलचे दर कमी करुन आम्हा तरुणांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे असे या दुचाकीस्वाराने सांगितले. महाराष्ट्रात आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८४.२६ आहे. मनसेने अशा अनोख्या प्रकारे वाढदिवस साजरा करुन पक्षाध्यक्षांना एक आगळी-वेगळी भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2018 1:11 pm

Web Title: mns president raj thackeray birthday petrol discount two wheelers
टॅग : Mns,Raj Thackeray
Next Stories
1 लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर नवीन ओळख मिळवलेल्या ललित साळवेंचं गावात जंगी स्वागत
2 शिवाजी महाराजांचा वापर अत्तरासारखा नको, ते रक्तात भिनायला हवेत – बाबासाहेब पुरंदरे
3 लाच म्हणून मागितली दोन किलो मटण बिर्याणी
Just Now!
X