News Flash

राज ठाकरेंचे विद्युत आयोगाला पत्र, BEST च्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

बेस्टच्या परिवहन विभागाच्या तुलनेत विद्युत विभाग नफ्यामध्ये आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करु नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाच्या तुलनेत विद्युत विभाग नफ्यामध्ये आहे. परिवहनचा तोटा भरुन काढण्यासाठी विद्युत विभागाचा नफा तिथे वळवला जातो. परिमाणी बेस्टने आता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

त्यावर मनसेचे आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे बेस्टचा प्रस्ताव असला तरी त्यासंबंधी अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:21 pm

Web Title: mns raj thackeray object on hike of best electricity bill dmp 82
Next Stories
1 नोंदणीकृत करारनामा नसल्यास विलंबासाठी व्याज मिळणे कठीण
2 बलात्कारपीडितेची ओळख उघड न करण्याबाबत समाजमाध्यमांनाही निर्देश
3 वेश्याव्यवसायासाठी नवजात बालिकेची खरेदी-विक्री करणारी टोळी अटकेत
Just Now!
X