प्रभादेवी ते पेडररोड अंतरासाठी अ‍ॅप कंपनीकडून महिलेला देयक

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : करोना चाचणीसाठी सेवेचा वापर केल्याची बाब लक्षात येताच ‘मोबीकॅब’ या अ‍ॅप आधारीत टॅक्सी सेवेने कर्करोग बाधित महिला व तिच्या नातेवाईक तरुणीला प्रभादेवी ते पेडर रोडपर्यंतच्या प्रवासासाठी तब्बल ३६ हजार रुपये शुल्क आकारले. दोन दिवसांपुर्वी कर्करोगग्रस्त प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. अन्य अ‍ॅप आधारीत टॅक्सी सेवा या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात आपापल्या परीने, मानवतेच्या दृष्टीकोनातून सेवा बजावत असताना मोबीकॅ बच्या या भुमिके मुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दादरच्या आगार बाजारात राहाणाऱ्या रिद्धी भाटकर दोन मे रोजी स्वत:ची आणि कर्करोगग्रस्त मावशीची करोना चाचणी करण्यासाठी मोबीकॅ ब कं पनीने पुरवलेल्या कारने पेडररोड येथील खासगी लॅबमध्ये गेल्या. ‘आम्हा दोघींमध्ये करोनाचे एकही लक्षण नव्हते. मात्र मावशीची तब्येत खूप बिघडली. तिचे उपचार माझगाव येथील रुग्णालयात सुरू होते. तेथे दाखल करण्यासाठी करोना चाचणी करून घेणे बंधनकारक होते. त्यामुळे आम्ही चाचणीसाठी बाहेर पडलो. रूग्णवाहिका न मिळाल्याने अखेर मोबीकॅ बशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनीही नकार दिला. मात्र काही वेळाने पुन्हा संपर्क साधल्यावर वाहन उपलब्ध होईल,’ असे सांगण्यात आले. मुखपट्टीसह अन्य प्रतिबंधात्मक उपाय योजूनच आम्ही प्रवास के ला. प्रवासाआधी संबंधीत लॅबचा पत्ता कं पनीला पाठवला होता. कं पनीने तेव्हाच शंका उपस्थित के ली असती तर नक्कीच आम्ही चाचणीसाठी जात असल्याचे सांगितले असते, असा दावा रिद्धी यांनी के ला.

भाटकर व त्यांच्या मावशी करोना चाचणीसाठी लॅबमध्ये गेल्याचे लक्षात आल्यानंतर कं पनीने भाटकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा भाटकर यांनी करोना चाचणीसाठी सेवा वापरल्याचे सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी या प्रवासासाठी कं पनीने ३५ हजार ९०० रुपयाचे देयक आकारले. चाचणीतून भाटकर आणि त्यांच्या मावशीला करोनाची लागण झाल्याचे निदान के ले गेले. दोघींना धारावीतील राजीव गांधी क्रीडा संकु लातील केंद्रात उपचार देण्यात येत होते. मात्र मावशीची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. कं पनीच्या संचालक संजना असवानी यांच्या दाव्यानुसार  बाधीत, संशयीत व्यक्तींची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा मोबीकॅ बकडील वाहनांत उपलब्ध नाही. या कं पनीकडून फक्त व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना विशेष वाहने पुरवली जातात, ही जाणीव भाटकर यांना आगाऊ करून देण्यात आली होती. भाटकर यांनी करोना चाचणी के ल्याचे लक्षात येताच संबंधीत वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागले. तसेच वाहन चालकाला दोन आठवडयासाठी विलगीकरणात पाठवावे लागले. भाटकर यांना सेवा दिल्याने इतर गरजूंना सेवा देता आली नाही. भाटकर यांनी  चाचणीची बाब दडविल्याने नुकसान झाल्याचे संजना यांनी सांगितले.