‘अदानी पॉवर’च्या तिरोडा येथील वीजप्रकल्पातील ६६० मेगावॉटचा एक वीजसंच आता सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता आणखी ६६० मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे.
राज्यातील विजेची मागणी भागवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन म्हणून ‘महावितरण’ने खासगी वीजकंपन्यांसह वीजखरेदी करार केले होते. त्यानुसार ‘अदानी पॉवर’चा पहिला ६६० मेगावॉटचा वीजसंच मागच्या वर्षी सुरू झाला. आता पुढचा ६६० मेगावॉटचा वीजसंच सुरू झाला आहे. महिनाभरात तो पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्यामुळे ऐन उन्हाळय़ात महाराष्ट्राच्या विजेच्या उपलब्धतेमध्ये ६६० मेगावॉट विजेची भर पडणार आहे.