News Flash

आजारपणाचा खर्च न झेपल्याने मुलाकडून आईची हत्या

वृद्ध आईच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या मुलाने तिची हत्या केल्याची घटना कुलाबा येथे उघडकीस आली आहे. राम कीर (५५) असे या मुलाचे नाव आहे.

| February 14, 2014 03:12 am

वृद्ध आईच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या मुलाने तिची हत्या केल्याची घटना कुलाबा येथे उघडकीस आली आहे. राम कीर (५५) असे या मुलाचे नाव आहे.
कुलाब्याच्या राजवाडकर मार्गावरील कुलाबावाडी येथील शनिदेव अपार्टमेंटमध्ये राम कीर आई सरस्वती (८०), पत्नी आणि २० वर्षीय मुलीसमवेत राहतो. पाच वर्षांपूर्वी तो आखाती देशात एका हॉटेलात काम करत होता. तेथून परतल्यानंतर तो बेरोजगार होता. सरस्वती यांना अर्धागवायूचा झटका आला होता. आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रामला आईचा आजारपणाचा खर्च पेलवत नव्हता. बुधवारी रात्री तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि पत्नी आणि आईला मारहाण करू लागला.
 पत्नीने स्वत:ची सुटका करून पोलीस ठाणे गाठले. पोलीस येईपर्यंत रामने केलेल्या मारहाणीत त्याची आई सरस्वती मरण पावली होती. घटनास्थळावरूनच रामला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:12 am

Web Title: mother killed by son in colaba
Next Stories
1 कांदिवली, मालाड, अंधेरीत पाणीकपात
2 आमच्या विधानाचा विपर्यास : खा. संजीव नाईक
3 नाईकांच्या दरबारी शिवसेनेचा गोंधळ
Just Now!
X