राज्यातील पुरातन वास्तू जपणाऱ्या आणि त्या पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ला (एमटीडीसी) बर्लिनमध्ये ‘बेस्ट स्टेट फॉर हेरिटेज’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दर वर्षी बर्लिनमध्ये होणाऱ्या ‘आयटीबी बर्लिन २०१६’ या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात ‘एमटीडीसी’ला पुरस्कार मिळाला आहे.
पुरातन वास्तूंचे महत्त्व ओळखून पर्यटनासाठी त्या खुल्या करण्यासाठी आखल्या गेलेल्या योजना, धोरण यांचे अवलोकन करून हा पुरस्कार देण्यात येतो. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानूतिया आणि केंद्रीय पर्यटन सचिव विनोद झुत्शी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.