लोकसत्ता गप्पाउपक्रमांतर्गत आयोजन

आपल्या प्रतिभावान व प्रयोगशील गायकीने स्वरमंडल तोलून धरणारे ज्येष्ठ गायक पंडित मुकुल शिवपुत्र यांची गानमैफल म्हणजे गानप्रेमींसाठी एक अनोखा स्वरयोगच. आपल्या गाण्याच्या रंगात संगीतचाहत्यांना रंगवून टाकणाऱ्या या श्रेष्ठ गायकाची एक मैफल ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी, २५ मार्च रोजी निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत सूर लागतील ते गप्पांचे.. स्वर आळवले जातील ते आठवणींचे.. आणि षड्ज लागेल तो संवादाचा!

Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

विविध क्षेत्रांतील मातब्बरांशी निमंत्रितांचा खुला संवाद असे स्वरूप असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत याआधी ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे, प्रतिभावंत कवी-गीतकार जावेद अख्तर ही मंडळी सहभागी झाली होती. त्यातील पुढील कार्यक्रमात पंडित मुकुल शिवपुत्र हे निमंत्रितांशी संवाद साधतील. ‘केसरी’ हे या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर आहेत. ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हेदेखील या गप्पांचे असोसिएट पार्टनर आहेत. ‘एलआयसी’ हे पॉवर्ड बाय पार्टनर असून, ‘झी २४ तास’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

केवळ निमंत्रितांसाठीच

पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याशी गप्पांचा हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे. मात्र, ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वार्ताकनातून त्याचा आस्वाद वाचकांना घेता येईल. तसेच, झी २४ तास या वाहिनीवर नंतर हा कार्यक्रम पाहण्याची संधीही गानरसिकांना मिळेल.