आधुनिक भोगवादी जीवनशैलीमुळे अपरिहार्यपणे भेडसावणाऱ्या दुष्परिणामांना तोंड द्यायचे असेल तर ‘योग’ हाच पर्याय आहे, हे कळते, पण अनेकदा वळत नाही. अखेर गेल्या वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिनी सामूहिक योगसाधना करण्याचा पायंडा पडला. शाळेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ांपर्यंत सर्व थरातील व्यक्तींनी सामूहिकपणे मोठय़ा संख्येने विविध आसने करून ‘योग दिन’ साजरा केला. सकाळी मुंबईमध्ये पाऊस पडला असला तरी त्यामुळे ‘योग उत्साहा’वर पाणी फिरले नाही. शहर व उपनगरांतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आवर्जून योगसने केली. अनेक संघटना, संस्थांनी योगासने शिबिरे आयोजित केली होती, अनेक रहिवासी सोयसायटय़ांनीही योगसन कार्यक्रमाचे खास आयोजन केले होते. अनेकांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात शांत चित्ताने ध्यान लावून मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 22, 2016 4:54 am