चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देणारे विशेष शाखेचे उपायुक्त अंकुश शिंदे, संग्रामसिंग निशाणदार, लक्ष्मीकांत पाटील आणि शीला साईल या मुंबईतील चार उपायुक्तांसह राज्यातील ३२ अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत. साताऱ्याचे विद्यमान अधीक्षक अभिनव देशमुख यांची गडचिरोलीत तर गडचिरोलीचे अधीक्षक संदीप पाटील यांचे साताऱ्याचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लाठीमारामुळे वादग्रस्त ठरलेल्या दत्ता शिंदे यांची नियुक्ती आता सांगलीचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगलीचे अधीक्षक सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडीचे उपायुक्त तसेच रायगडचे अधीक्षक म्हणून आपल्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे अंकुश शिंदे हे नाशिक ग्रामीण विभागाचे नवे अधीक्षक असतील. याशिवाय संजय मोहिते, सचिन पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, राजेंद्र दाभाडे, संजय पाटील हे नवे उपायुक्त मुंबईला लाभले आहेत. परिमंडळ दहाच्या उपायुक्त एन. अंबिका यांची नियुक्ती परिमंडळ चारमध्ये करण्यात आली आहे. अन्य उपायुक्त/ अधीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे : अमोल तांबे (महामार्ग सुरक्षा, पुणे), मनोज पाटील (ठाणे), आर. रामास्वामी (अहेरी), संग्रामसिंग निशाणदार ( ठाणे), दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील (नाशिक), शशीकुमार मीना, मोरेश्वर अत्राम (अमरावती), सुनील कडासने, राकेश कलासागर, जी. श्रीधर, रवींद्र परदेशी , अविनाश अंबुरे, पी. पी. शेवाळे (मुंबई), शीला साईल, सुनील बाबर, एस. एस. मेंगडे (ठाणे), राजीव जैन ( नवी मुंबई), संजय ऐनपुरे (नांदेड), डॉ. महेश घुर्ये (नाशिक).