News Flash

शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांना सापडले पाय, गूढ अद्यापही कायम

मुंबई पोलिसांना घाटकोपर येथे मृतदेहाचे कापण्यात आलेले पाय सापडले आहेत

(प्रातिनिधिक)

मुंबई पोलिसांना घाटकोपर येथे मृतदेहाचे कापण्यात आलेले पाय सापडले आहेत. ३१ डिसेंबर रोजी घाटकोपर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचं शीर आणि पायाचा खालील भाग कापला होता. कापण्यात आलेले पायाचे भाग पोलिसांना त्याच ठिकाणी शोध घेतला असता सापडले आहेत अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र मृतदेहाचं शीर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही.

पोलिसांनी सापडलेले पाय शवविच्छेदनासाठी पाठवले असून हे त्याच मृतदेहाचे आहेत का याची चाचपणी केली जात आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तो बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला होता. विद्याविहार येथील एसटी वर्कशॉपच्या बाहेर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला होता.

मृतदेहाचे तुकडे करुन टाकून देण्यात आल्याची ही गेल्या काही दिवसांमधील तिसरी घटना आहे. याआधी एका तरुण आणि तरुणीचीही अशाच पद्धतीने हत्या करत मृतदेह टाकून देण्यात आला होता. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 8:53 am

Web Title: mumbai cops find two severed legs in ghatkopar sgy 87
Next Stories
1 वडील मुख्यमंत्री तर पुत्र मंत्री ही राज्यांतील सहावी जोडी
2 बाजार समित्या काबीज करण्यासाठी नवी रणनीती
3 जीएसटी भरपाईसाठी भाजपेतर राज्यांचा दबावगट ?
Just Now!
X