News Flash

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनी केला गँगरेप

इन्स्टाग्राम झाली होती ओळख... वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला बोलवलं... घटना ऐकून पोलिसही हादरले... सहा जणांना अटक

सगळी महिलांवरील अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच मुंबईत एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्रावर भेटलेल्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ‘इन्स्टा’वरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

या घटनेबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. ३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना घडली आहे. १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांना मालाड वेस्ट पोलीस ठाण्यात दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक मुलगी स्वतःच घरी परत आली.

३१ मे आणि १ जूनच्या रात्री तिच्यासोबत काय घडलं?

दुपारच्या वेळी मुलगी घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिला अशक्तपणाही आला होता. तिच्या आईवडिलांनी रात्रभर कुठे होती, याबद्दल विचारणा केली. मात्र, तिनेही काहीही सांगितलं नाही. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांचं एक पथक मुलीच्या घरी गेलं. त्यांनी तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला मुलीने टाळाटाळ केली. थोड्या वेळाने सगळी आपबीती पोलिसांना सांगितली. ते ऐकून पोलिसही हादरले.

क्राईम जगत – सुसाईड बॉम्बर असल्याचे सांगत बॅंकेला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

इन्स्टाग्रामवर मुलीचे काही जण मित्र बनले होते. त्यातीलच एका मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी पार्टी ठेवली होती. ३१ मे रोजी रात्री सर्वजण मढ येथील एका हॉटेल बाहेर भेटले. त्यांनी गाडीवरच केक कापून सेलिब्रेशन केलं. त्याचवेळी तिचे दोन मित्र तिला कारमध्ये घेऊन गेले. त्या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला मालाड भागातील दुसऱ्या मित्राच्या घरीत सोडलं. तिथेही तिच्यावर मित्रांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या दुसऱ्या मित्राच्या घरी गेली. पण दुर्दैवाने तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

हेही वाचा – सव्वा दोन वर्षांत मुंबई रेल्वे हद्दीत ४० हजार चोऱ्या

सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुलीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यातंर्गत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी १८ ते २३ या वयोगटातील असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 3:03 pm

Web Title: mumbai crime news mumbai police instagram friends gang rape minor girl gang rape in mumbai bmh 90
Next Stories
1 “तुम्ही नियम मोडले, तर आम्हालाही तो अधिकार”, खेड प्रकरणावरून संजय राऊतांचा राष्ट्रवादीला पुन्हा इशारा!
2 चिमणी गिधाडांना भारी पडली -जितेंद्र आव्हाड
3 अराजक टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज!
Just Now!
X