03 December 2020

News Flash

पीडित तरुणीने चार आरोपींना ओळखले

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना छायाचित्रकार तरुणीने ओळख परेडमध्ये ओळखले आहे. शुक्रवारी दुपारी आर्थर रोड

| September 7, 2013 05:54 am

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना छायाचित्रकार तरुणीने ओळख परेडमध्ये ओळखले आहे. शुक्रवारी दुपारी आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड झाली. यामुळे या प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे.
२२ ऑगस्ट रोजी महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये २३ वर्षीय छायाचित्रकार तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणात अल्पवयीन आरोपीसह पाचही जणांना पोलिसांनी अटक केली होती. यातील अल्पवयीन आरोपीला बुधवारी झालेल्या ओळखपरेडमध्ये पीडित तरुणीने ओळखले होते. शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या ओळख परेड मध्ये पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने सलीम अन्सारी, मोहम्मद कासम, सिराज रेहमान खान आणि विजय जाधव या चारही आरोपींना ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींच्या डीएनए तपासणीचे नमुनेही जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 5:54 am

Web Title: mumbai gang rape victim recognises foure accused
Next Stories
1 ‘डब्यूआयएए’मध्ये आधुनिक चालक प्रशिक्षण
2 डान्स बार बंदीचा सुधारित वटहुकूम लवकरच
3 ‘खारफुटीवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची पाहणी करा’
Just Now!
X