लालबाग उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस मोठी भेग पडल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. पहाटेच्या  सुमारास भेग पडल्याचे लक्षात आल्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केली होती. सध्या सीएसटी-दादर वाहतूक एक लेनमध्ये तर  दादर – सीएसटी संपूर्ण वाहतूक सुरु करण्यात आली आहे. माटुंगाकडील वाहतूकही वळवण्यात आली आहे. परंतु अचानक झालेल्या या बदलामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. गत नोव्हेंबर महिन्यापासून तिसऱ्यांदा पुलाला भेग पडल्याने येथील वाहतूक बंद करण्याचीही तिसरी वेळ आहे.
काही दिवसांपूर्वीही पुलाला भेग पडली होती. त्यावेळी वाहतूक बंद करून याठिकाणी दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु आज (सोमवारी) पुन्हा दोन्ही बाजूकडे भेग पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे मात्र वाहनधारकांची तारांबळ उडाली. दोन्ही पुलाच्या जॉईंटमधील रबर सील पडल्याने ही भेग पडली होती.

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल