27 February 2021

News Flash

मुंबईतील थरकाप उडवणारी घटना; प्रेयसीला पेट्रोल ओतून पेटवलं, मिठी मारल्यानं प्रियकराचा जागीच मृत्यू

प्रेयसीची प्रकृती गंभीर; जोगेश्वर पूर्वमधील घटना

(संग्रहित छायाचित्र)

काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दील घडली आहे. चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. आग लागताच तिने प्रियकराला मिठी मारली. यात प्रियकराचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी विजय खांबे (मयत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून मयत प्रियकर विजय खांबे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधी नगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. मयत तरुण आणि प्रेयसी या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून खटके उडत होते.

आणखी वाचा- पुण्यातला धक्कादायक प्रकार; हात-पाय बांधून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं?

विजयला पीडित तरुणीशी लग्न करायचे होते. मात्र, तिच्या घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. दारुच्या सवयीमुळे विजय वारंवार तरुणीचा छळ करत होता. कंटाळून प्रेयसीने विजयशी प्रेमसंबंध ठेवण्यास आणि त्याच्याशी लग्न करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे संतापाच्या भरात विजयने टोकाचे पाऊल उचललं.

शनिवारी (६ फेब्रुवारी) पीडित तरुणी एकटीच घरी होती. याची माहिती विजयला होती. त्यामुळे प्रेयसीला जाळण्यासाठी विजय पेट्रोल घेऊन गेला. मेघवाडी परिसरातील तिच्या घरी गेल्यानंतर विजयने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर तिला पेटवून दिले. पेटवून दिल्यानंतर तिने त्याला मिठी मारली. त्यामुळे तरुणीसोबत विजयही पेटला. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग विझवली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, अखेर आगीत होरपळून विजयचा मृत्यू झाला होता. तर प्रेयसी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झूंज देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 3:35 pm

Web Title: mumbai man pours petrol on woman sets her ablaze dies as she holds on to him bmh 90
Next Stories
1 राज्यात उत्तुंग इमारतींसाठी निर्बंध शिथिल
2 सहकारी संस्थांची सरकारकडूनच कोंडी
3 मुंबईतील ४० खासगी रुग्णालये धोकादायक
Just Now!
X