26 February 2021

News Flash

आई-वडिलांनी न विचारता जन्म दिला, मुलगा दाखल करणार खटला

मी माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतो. पण त्यांनी आपल्या आनंदासाठी मला जन्म दिला होता.

२७ वर्षीय रफाएल सॅम्युएलने आपल्या फेसबुक अकाऊंटवर यासंबंधीची पोस्ट लिहून ही घोषणा केली होती.

मुंबईतील एका युवकाने आपल्याच पालकांविरोधात खटला दाखल करण्याचे ठरवले आहे. आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय आपल्याला जन्म दिल्याचा या युवकाने आरोप केला आहे. २७ वर्षीय रफाएल सॅम्युएलने आपल्या फेसबुक अकाऊंटवर यासंबंधीची पोस्ट लिहून ही घोषणा केली होती. मी माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतो. पण त्यांनी आपल्या आनंदासाठी मला जन्म दिला होता, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. कदाचित नंतर त्याने ती पोस्ट डिलिट केली आहे. पण अँटी नेटलिज्मवर त्याने दुसरी पोस्ट केल्याचे दिसते.

मानवी जीवनात खूप समस्या आहेत. त्यामुळे लोकांनी मुलांना जन्म देणे बंद केले पाहिजे, अशी अँटी नेटलिज्मची विचारधारा आहे. सॅम्युएल या विचारांनी प्रभावित झाल्याचे दिसते. त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, जेव्हा कोणी त्यांच्या स्वार्थासाठी मला जन्म दिला असेल तर मी का कष्ट केले पाहिजे ? मी काम का केले पाहिजे, असा सवाल त्याने उपस्थित केला. एका मुलाखतीत सॅम्युएलने म्हटले की, वंशवृद्धी जगातील सर्वाधिक आत्मकेंद्रित (नार्सिसिस्टिक) काम आहे. लोकांना हे विचारले पाहिजे की ते मुलांना जन्म का देतात. ज्या जगात त्रास, पीडा आहे, त्या जगात मुलांना आणणे चुकीचे आहे.

हे जग समस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे लोकांनी मुलांना जन्म देऊ नये यासाठी त्यांचे मन वळवणे हेच अँटी नेटलिस्टचे उद्धिष्ठ आहे, असे सॅम्युएलने म्हटले आहे. त्याने बुधवारी सकाळी आणखी एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या आईचे विचारही शेअर केले आहेत.

मुलाच्या उतावळेपणाचे कौतुक करताना सॅम्युएलच्या आईने म्हटले की, जर रफाएलने न्यायालयात त्याला जन्म देण्यापूर्वी त्यांची परवानगी घेऊ शकली असती, हे सिद्ध करू शकला तर मी आपली चूक मान्य करेन. माझा मुलगा एका स्वतंत्र विचाराने मोठा झाला, याचा मला आनंद आहे. मला याचाही विश्वास आहे की, तो आपल्या आनंदाचा मार्ग स्वत:च शोधेन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 1:37 am

Web Title: mumbai man wants to sue his parents for giving birth to him without his consent
Next Stories
1 दोन वर्षांत १२५ पादचारी पूल
2 ‘तोतया’ क्लीन अप मार्शलची टोळी!
3 समाजमाध्यमांमुळे पक्षाघात उपचारयंत्राचा प्रसार
Just Now!
X