News Flash

गँगस्टर एजाज लकडावालाचा भाऊ खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

संग्रहित छायाचित्र

मुंबईतल्या बड्या बांधकाम व्यवसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाचा भाऊ अकील लकडावालाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर अकीलला न्यायालयासमोर हजर केले असता 8 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

डिसेंबर 2018 पासून एजाज लकडावालाने परदेशातून पुन्हा एकदा मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली होती. फिर्यादी बांधकाम व्यवसायिकाला इंटरनॅशनल कॉलद्वारे खंडणीचे फोन यायला लागले. बांधकाम व्यवसायिकाने हे फोन घेणं बंद केल्यानंतर त्याला लँडलाईनवरुन धमकीचे फोन यायला लागले. यानंतर फिर्यादीने मुंबईच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केलेल्या तपासात बांधकाम व्यवसायिकाला येणाऱ्या धमकीच्या फोनमागे त्याचा भाऊ अकील लकडावाला उर्फ मर्चंटचा सहभाग असल्याचं समोर आलं. यानंतर सापळा रचून पोलिसांनी अकीलला अटक केली आहे. या प्रकरणातला पुढील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 9:36 pm

Web Title: mumbai police arrested gangster aijaj lakdawala brother akil on extortion charges
Next Stories
1 भारत-पाकिस्तानातील अर्ध्या लोकांना ‘युद्ध नको’ – शालिनी ठाकरे
2 चला, शूज् डिझायनर बनूया!
3 पालघर पुन्हा भूकंपाने हादरले; गुजरात सीमेपर्यंत जाणवले धक्के
Just Now!
X