News Flash

…म्हणून तिने ट्रेनमधून उतरुन त्याच्या कानाखाली मारली, प्रभादेवीतील घटना

सकाळी पावणेनऊच्या सुमारास बोरीवली स्लो लोकल पकडण्यासाठी महिला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी होती.

कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या महिलेला चोरटा स्पर्श करणाऱ्या आरोपीला नागरीकांनी चांगलाच चोप दिला. मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. राजेंद्र रामाणे (३५) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तक्रार नोंदवणारी महिला प्रभादेवीची रहिवाशी असून ती अंधेरी येथे नोकरी करते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास बोरीवली स्लो लोकल पकडण्यासाठी महिला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी होती. ८.५४ च्या सुमारास ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर महिला ट्रेनमध्ये चढत असताना मागून कोणातरी चोरटा स्पर्श करत असल्याचे तिला जाणवले.

तिने मागे वळून पाहिले तर आरोपी तिथे उभा होता. “माझ्याकडे पाहून आरोपीने अश्लील शेरेबाजी सुद्धा केली” असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. “मी ट्रेनमधून खाली उतरुन त्याच्या कानाखाली मारली. पण तो जागेवरुन हलला नाही. माझ्याकडे पाहून हसत होता. मी आरडाओरडा केल्यानंतर स्टेशनवरील अन्य प्रवासी तिथे आले व त्यांनी आरोपीला मारहाण केली.” असे महिलेने सांगितले. महिलेसह अन्य प्रवाशांनी आरोपी रामाणेला नंतर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 11:51 am

Web Title: mumbai prabhadevi railway station woman slaps groper on railway station dmp 82
Next Stories
1 महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं तो मतदारांचा अपमान-राज ठाकरे
2 जलसिंचन घोटाळ्याचा तपास अद्याप अपूर्णच
3 मेट्रो-४ सह, ठाण्यातील सात प्रकल्पांचा अडथळा दूर
Just Now!
X