News Flash

मुंबईत झाड कोसळून दोघांचा मृ्त्यू

मालाडमधील नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर सकाळी सहाच्या सुमारास झाडाची फांदी कोसळली.

आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईत झाड कोसळल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शुक्रवारी घडल्या असून यातील पहिली घटना मालाडमध्ये घडली आहे. तर दुसरी घटना अंधेरीत घडली आहे. मालाड येथील घटनेत शैलेश राठोड (वय ३८) यांचा मृत्यू झाला आहे.

मालाडमधील नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर सकाळी सहाच्या सुमारास झाडाची फांदी कोसळली. यादरम्यान तिथून शैलेश राठोड (वय ३८) जात होते. फांदी अंगावर पडल्याने त्यांना जीव गमवावा लागला. यात आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी दुपारी अंधेरीतही झाड कोसळल्याची घटना घडली.  हे झाड रस्त्यावरुन फोनवर बोलत जाणाऱ्या पादचाऱ्याच्या अंगावर पडले. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुंबईत झाड कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना वारंवार घडत आहेत. जुलै २०१७ मध्ये कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जात असताना झाड अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला होता. तर ठाण्यात वकील किशोर पवार यांचा २३ जुलै २०१७ रोजी मृत्यू झाला होता. २०१७ ते २०१९ या कालावधीत मुंबईत झाड कोसळल्याने एकूण ८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 12:48 pm

Web Title: mumbai tree branch falls in malad one dies another injured
Next Stories
1 ‘वायू’चा पावसावर परिणाम, मुंबईकरांना आणखी सात दिवस पहावी लागणार वाट
2 नायर रूग्णालयातून अपहरण झालेले 5 दिवसांचे बाळ सापडले
3 मुंबईत १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X