मुंबई विद्यापीठ प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लॉच्या अभ्यासक्रमासाठी ६०/४० ही प्रणाली अंमलात आणली होती. पण विद्यापीठाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला. अखेर विद्यार्थापुढे मुंबई विद्यापीठ झुकले असून सध्या ६०/४० या प्रणालीला स्थगिती दिली आहे. मुंबई विद्यापीठाने तसे संलग्नित महाविद्यालयांना सुचना दिली आहे की पुढील निर्णय येईपर्यंत ६०/४० हा पॅटर्न राबवू नये.

मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी श्रेयांक श्रेणी ही पद्धत सुरू केली आहे. या प्रणालीच्या अनुषंगाने विद्यापीठाने लॉ शाखेच्या परीक्षा पद्धतीत बदल केला होता. २४ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाने लॉसाठी ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ६० गुणांची लेखी परिक्षा आणि ४० गुणांची प्रात्याक्षिक परिक्षा होती. लॉच्या पदवी आणि पदवीत्तर अभ्यसक्रमासाठी ६०/४० हा पॅटर्न अंमलात आणला होता. पण या परीक्षा पॅर्टनला स्टुंडट लॉ कौन्सिल आणि इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवित त्यात बदल करण्याची मागणी केली होती