News Flash

मुंबईत भरधाव चारचाकीच्या धडकेने चार जण जखमी

कारचा पुढचा भाग चेपला गेला असून काचेला तडे; चालक ताब्यात

जॅग्वार कारची धडक, चौघे जखमी

मुंबईतील वर्सोवा परिसरात भरधाव जॅग्वार कारने वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. सोमवारी रात्री ही घटना घडली. जॅग्वार कार भरधाव वेगात असताना कारने चौघांना धडक दिली आणि कार पुढे इतर वाहनांना जाऊन धडकली. या धडकेत कारचा पुढचा भाग चेपला गेला असल्याचे कार अत्यंत वेगात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, कारची पुढील काचही फुटली असून काचेला तडे गेले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर कारच्या चालकाला तेथील लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 2:45 am

Web Title: mumbai versova jaquar car hit 4 people injured
टॅग : Injured
Next Stories
1 सचिन तेंडुलकरकडून पश्चिम रेल्वेसाठी जनजागृती
2 कोकणमार्गातील खड्डय़ांवरून सरकारची खरडपट्टी
3 ठाणे खाडीवरून चार किलोमीटरचा उन्नत मार्ग
Just Now!
X