फेसबुकवर ओळख झालेल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीवर बलात्कार घडवून आणणाऱ्या पतीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी रिक्षा चालक असून, तो मुंबई शेजारच्या पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. त्याचे दोन साथीदार मुंबईत एका फार्मा कंपनीमध्ये नोकरीला आहेत. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.
“आरोपीने चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला जोगेश्वरीला आणले. त्यानंतर तो पत्नीला जोगेश्वरीत एक झोपडीत घेऊन गेला. तिथे त्याचे दोन मित्र आधीपासूनच उपस्थित होते. फेसबुकवरुन त्यांची आरोपी बरोबर ओळख झाली होती” असे पोलिसांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
आरोपीने त्याच्या दोन्ही मित्रांना पत्नीवर बलात्कार करायला सांगितला. नंतर स्वत: त्याने लैंगिक जबरदस्ती केली. या प्रकारानंतर पत्नी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली. त्यांनी हे प्रकरण जोगेश्वरी पोलिसांकडे ट्रान्सफर केले.
मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली. पत्नीने जानेवारी महिन्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला. कलम ३७६ च्या (सामूहिक बलात्कार) आरोपाखाली तिन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 1:44 pm