News Flash

दोन वर्षांनंतर दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले

तब्बल दोन वर्षांनंतर मिळालेल्या व्हिसेरा अहवालामुळे कळव्यातील एका दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले असून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष

| January 15, 2013 02:27 am

तब्बल दोन वर्षांनंतर मिळालेल्या व्हिसेरा अहवालामुळे कळव्यातील एका दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले असून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, कळवा पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पतीच हयात नसल्याने पोलिसांनी हा गुन्हा दफ्तरी जमा केला आहे. येथील मनीषानगरमधील  सुहास वासुदेव परब (३०) आणि त्यांची पत्नी शिल्पा ऊर्फ सुप्रिया यांचे मृतदेह १२ ऑगस्ट २०११ रोजी राहत्या घरामध्ये कळवा पोलिसांना आढळले दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.  दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कळवा पोलिसांना या दोघांचा व्हिसेरा अहवाल मिळाला असून त्यामध्ये शिल्पा यांची हत्या झाल्याचे आणि सुहास याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयी वृत्तीमुळे सुहासने शिल्पाची हत्या करून नंतर ब्लेडने हाताची नस कापून आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 2:27 am

Web Title: murder mystery of husband wife open after two year
Next Stories
1 पालिका रुग्णालयात महिलेवर हल्ला
2 तांत्रिक बिघाडामुळे प. रे. विस्कळीत
3 पाकिस्तानविरोधात शिवसेनेची निदर्शने
Just Now!
X