News Flash

उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा तडीपार

विविध गंभीर गुन्ह्य़ांमध्ये सामील असलेला उल्हासनगरमधील अक्षय सुरेश गायकवाड ऊर्फबाबू या गुंडाला पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी रविवारी दोन वर्षांसाठी ठाणे

| May 19, 2014 01:28 am

विविध गंभीर गुन्ह्य़ांमध्ये सामील असलेला उल्हासनगरमधील अक्षय सुरेश गायकवाड ऊर्फबाबू या गुंडाला पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी रविवारी दोन वर्षांसाठी ठाणे, मुंबई या दोन जिल्ह्य़ांतून तडीपार केले. अक्षय हा  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आहे.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये अक्षयवर गंभीर गुन्हे दाखल होते. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षयने एकाचा खून केला होता. काही महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांना दारू पिऊन बेदम मारहाण केली होती. असे अनेक प्रकार अक्षयकडून सातत्याने सुरू होते. शिवाजीनगर पोलिसांनी अक्षयची माहिती जमा करून त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यासाठी उपायुक्त जाधव यांच्यासमोर फाईल सादर केली होती. त्यांच्या आदेशावरून  अक्षयला दोन जिल्ह्य़ांतून तडीपार केले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:28 am

Web Title: ncp leader son banished
Next Stories
1 ‘नमो’मय नगरसेवकांचा आमदारकीचा मनोदय
2 ख्यातनाम छायाचित्रकार गोपाळ बोधे यांचे निधन
3 पावसाळ्यात भरतीवेळी मुंबई तुंबणार?
Just Now!
X