News Flash

जेबीआयएमएसला नोटीस

मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीला (जेबीआयएमएस) अन्न

| December 7, 2013 02:06 am

मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीला (जेबीआयएमएस) अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्वयंपाक करण्यावर बंदी आणणारी नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जेबीआयएमएसच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्याचे दिसून आले होते. त्या वेळी चौकशी केली असता स्वयंपाकघर चालविणाऱ्या कंत्राटदाराकडे परवानाच नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. कंत्राटदाराने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने ही नोटीस बजावली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त शैलेश आढाव यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:06 am

Web Title: notice to jbims
Next Stories
1 तीन चाळी स्फोटात उद्ध्वस्त, टँकर मालकाचा शोध सुरू
2 संजय दत्तला ३० दिवसांच्या सुट्टीची ‘मान्यता’
3 दिव्यात डॉ.आंबेडकरांचे बॅनर उतरवल्याने रेल रोको
Just Now!
X