31व्हॉट्सअ‍ॅप या संदेशवहन अ‍ॅपमध्ये निळय़ा रंगाची बरोबरची खूण आल्यापासून या अ‍ॅपबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर तोडगा म्हणून कंपनीने अ‍ॅप अद्ययावत करून निळी खूण पर्यायी ठेवली आहे. अद्ययावत अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये हा पर्याय देण्यात आला आहे.
आपण पाठवलेला संदेश समोरच्या व्यक्तीने वाचला की नाही हे समजण्यासाठी पूर्वीच्या बरोबरच्या दोन खुणांना निळा रंग देण्यात आला होता. तसेच एखाद्या समुहामध्ये आपण पाठविलेला संदेश किती जणांना वाचला याची माहितीही आपल्याला मिळू लागली होती. पण ही माहिती पुरविणे धोकादायक असल्याचे अनेकांना वाटले आणि त्याच्याविरोधात चर्चा रंगू लागल्या. परदेशात तर या खुणेबबत समजामाध्यमांमधून टीकेची झोड उठविली जाऊ लागली. आम्ही एखाद्याचा संदेश वाचला की नाही ही आमची गोपनीय बाब असून ती उघड करणे चुकीचे असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. तर इतके दिवस मित्रांना किंवा विविध नात्यांना जोडणारी ही सुविधा भविष्यात या नात्यांमध्ये तणाव निर्माण करणारीही ठरू शकेल, अशी चर्चाही रंगू लागली. या सर्वाचा विचार करून कंपनीने अद्ययावत आवृत्ती बाजारात आणली आणि यामध्ये आपल्याला प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये निळय़ा खुणा लपविण्याचा आणि आपण एखाद्या समुहातील कुणाचा संदेश वाचला की नाही हे लोकांपासून लपवू शकतो.
काय आहे नवीन सेटिंग
व्हॉट्सअ‍ॅपचे 2.11.444 हे व्हर्जन डाऊनलोड करून घ्या. पण हे व्हर्जन सध्या केवळ व्हॉट्सअ‍ॅपचया संकेतस्थळावरच उपलब्ध आहे. यामध्ये मेन्यूमध्ये जा तेथे सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी हा पर्याय निवडा. यामध्ये ‘रीड रीसीप्ट्स’ असा पर्याय असेल त्याच्यासमोरील बॉक्समध्ये बरोबरची खूण असेल, ती खून काढून टाका. म्हणजे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील ‘रीड रीसीप्ट्स’ पर्याय काम करणे बंद होईल. जेणेकरून संदेश वाचणे किंवा न वाचण्याचे तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला परत मिळेल.