मुंबई : मुंबईतील करोना रुग्णाव्यतिरिक्त कर्करोग, डायलिसिस किं वा अन्य आजार असलेल्या रुग्णांसाठी ओला कॅ बने आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी शासनाकडूनही मंजुरी मिळाली आहे.

सध्या मुंबईत बेस्ट व एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवा देत आहेत. तर रिक्षा, टॅक्सीही अत्यावश्यक सेवा देऊ शकतात. मात्र टाळेबंदीमुळे रिक्षा-टॅक्सीची अत्यावश्यक सेवा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोबाइलवर आधारित खासगी टॅक्सींचा पर्याय ओलाने समोर आणला आहे. मुंबईव्यतिरिक्त बेंगळूरु, नाशिक, वाराणसी, इंदूर, भोपाळ यांसह एकू ण १४ शहरांत आपत्कालीन सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले. ओला अ‍ॅपमध्ये ‘ओला इमर्जन्सी’ अशी स्वतंत्र श्रेणी असून त्यामार्फत प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. घर ते रुग्णालय अशी माहिती यात नमूद करावी लागेल. ओला अ‍ॅपमध्ये सध्या मुंबईतील जवळपास २०० रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यानंतर यांची संख्या वाढेल. के ंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार कॅ बचालकाकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन के ले जाणार आहे. मास्क व सॅनिटायझरचा स्वत:बरोबरच प्रवाशांनाही वापर करण्यास सांगण्यात येणार आहे. वैद्यकीय कर्मचारी, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही ओलाने स्वतंत्ररीत्या सेवा देण्यास सुरुवात के ली आहे.