25 October 2020

News Flash

‘लंडन आय’च्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’; अजित पवारांची घोषणा

याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी सहमतीही दर्शवली.

मुंबई : मुंबईमध्ये 'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे.

पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध London eye (लंडन आय) या इमारतीच्या धर्तीवर (Mumbai eye) ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, “जगप्रसिद्ध ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर टाकेल अशी ‘मुंबई आय’ इमारत उभारण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी सहमतीही दर्शवली.”

“सी लिंकवरुन वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी एका जागेवर हे ‘मुंबई आय’ उभारण्याचा विचार आहे. या जागेला जर सीआरझेडची अडचण आली नाही तर इथे चांगल्या प्रकारे ही वास्तू तयार होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता करण्यात येईल. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प उभारण्यात येईल” अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

काय आहे ‘लंडन आय’?

‘लंडन आय’ हा लंडन शहरातील एक अजस्त्र पाळणा आहे. थेम्स नदीच्या दक्षिणेकडील काठावर हा पाळणा उभारण्यात आला आहे. लंडनला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे. या पाळण्यातून संपूर्ण लंडन शहराचे दर्शन पर्यटकांना घेता येते. युनायटेड किंग्डममधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक या स्थळाला भेट देतात. १३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. याच्या बांधकामासाठी सुमारे ८ कोटी पाऊंड इतका खर्च आला होता. या ‘लंडन आय’मध्ये १२ अंडाकृती कुप्या आहेत. त्यात उभे राहून संपूर्ण लंडन शहर न्याहाळता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 4:00 pm

Web Title: on the lines of london eye mumbai eye will be created in mumbai announced by ajit pawar aau 85
Next Stories
1 “छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी”, उदयनराजेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
2 देखणं, दिमाखदार आणि अभिमान वाटावा असं स्मारक उभारणार -पवार
3 अमित शाह यांचे राऊतांनी केलं कौतुक, “शाह हे प्रखर राष्ट्रभक्त आहेत पण…”
Just Now!
X