लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठी शाळांचे पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून मराठी शाळांची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारे मराठी अभ्यास केंद्राचे ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ यंदा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान ऑनलाइन पार पडणार आहे. यानिमित्त मराठी शाळांतील शिक्षक, पालक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी वक्तृत्व आणि निबंध या दोन स्पर्धासाठी अनुक्रमे ‘ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील आव्हाने’ आणि ‘ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग‘ हे विषय आहेत.  सुशील शेजुळे : ९६०४५२३६६६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालकांसाठी वक्तृत्व आणि निबंध या दोन स्पर्धासाठी अनुक्रमे ‘करोनाकाळात शाळा घरात आली आणि..‘ आणि ‘करोनाकाळ आणि पाल्याच्या शिक्षणातील माझा सहभाग‘ हे विषय आहेत. यासाठी वैष्णवी : ८४२५८५४४८३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खुल्या गटासाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा यांसाठी अनुक्रमे ‘मराठी शाळांसाठी शासनाने काय करायला हवे‘, ‘मराठी शाळांसाठी मी काय करू शकतो‘ हे विषय आहेत. शिक्षक, पालक आणि खुल्या गटाच्या स्पर्धासाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी ५० रुपये आहे.

महाविद्यालयीन गटासाठी वक्तृत्व, निबंध या स्पर्धासाठी अनुक्रमे ‘माझी मराठी शाळा मला आवडते कारण..‘, ‘माझी मराठी शाळा अशी हवी‘ हे विषय आहेत. ुल्या आणि महाविद्यालयीन गटासाठी ‘मराठी शाळेचे मारेकरी‘ हा मीम स्पर्धेसाठीचा विषय आहे. एकच मीम जेपीजी स्वरूपात पाठवावे. यासाठी प्रणव : ७३७८४०३५७१ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय गटासाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धासाठी ‘टाळेबंदीतील शाळेच्या आठवणी‘, ‘मला ऑनलाइन शिक्षण आवडते का‘, ‘माझी घरातली शाळा‘ असे विषय आहेत. के वळ एकच चित्र जेपीजी स्वरूपात पाठवावे. स्पर्धेचे माध्यम मराठी असून के वळ मराठी शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. संपर्क  – प्रतिक्षा – ७२०८००८९८२. सर्व गटांची वक्तृत्व स्पर्धेची दृकश्राव्य फीत कमाल ३ मिनिटांची असावी. साहित्य पाठवण्यासाठी शेवटची तारीख ५ डिसेंबर आहे.

साहित्य पाठवण्यासाठी ईमेल आयडी

खुला आणि महाविद्यलयीन गट – maha.khulaspardha2020@gmail.com

शिक्षक गट – aamhishikshak2020@gmail.com

पालक गट – palakspardha2020@gmail.com

शालेय गट – shalaspardha2020@gmail.com