प्रशिक्षकांकडून वेळापत्रक तयार; अनेक खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीमुळे मैदाने आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्रे बंद असल्याने खेळाडूंचा मैदानावरील सराव बंद आहे. मात्र तरीही टाळेबंदीनंतर खेळात अडचणी येऊ नयेत आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी नवोदित खेळाडूंनी घरच्या घरी सराव सुरू ठेवला आहे. यासाठी प्रशिक्षकांनीही त्यांना वेळापत्रक तयार करून दिले आहे. काही जण खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन करत आहेत.

राज्यस्तरीय नेमबाज १२ वर्षीय प्राची गायकवाडने आपल्या घरालाच ‘शूटिंग रेंज’ बनवले आहे. भिंतीच्या समोर उभे राहून ओठांच्या रेषेत भिंतीवर एक टिंब काढून त्याला लक्ष्य के ले जाते. नेमबाजीचा पोशाख (जॅके ट ट्राऊजर) घालून रोज किमान दोन तास तरी ती रायफल धरण्याचा सराव करते. या वेळी रायफल ‘ड्रायमोड’वर असते. म्हणजेच चाप ओढल्यानंतर रायफलमधून गोळी सुटत नाही, पण तरीही हालचालीवरून सराव व्यवस्थित झाला आहे की नाही याचा अंदाज येतो. ‘ज्यांनी नुकतेच नेमबाजीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात के ली आहे त्यांच्याकडे पोशाख आणि रायफल नसते. त्यामुळे सराव करता येत नाही. अशा नेमबाजांना टाळेबंदीनंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल,’ असे प्राची सांगते. ११ वर्षीय पिया ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळते. तिचे प्रशिक्षक झूमवरून मार्गदर्शन करतात. पिया शक्य तेवढा सराव घरात नाही तर गच्चीवरून जाऊन करते. मेडिटेशन, योगसाधना, बॅले याद्वारे ती मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेते. जलतरणपटूंना टाळेबंदी संपण्याचीच वाट पाहावी लागत आहे. मात्र तोपर्यंत शारीरिक सक्षमता कमावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोहताना बटरफ्लाय प्रकारात हात-पाय मजबूत असावे लागतात. त्यासाठी दोरीउडय़ा मारत असल्याचे १३ वर्षीय जिल्हास्तरीय जलतरणपटू शार्दूल वैद्य सांगतो. ‘सरावात खंड पडल्याने पुन्हा पोहायला उतरल्यास सुरुवातीला थोडा दम लागेल. मात्र एक-दोन आठवडय़ांत पूर्वीपणे पोहायला शिके न,’ असे शार्दूल आत्मविश्वासाने म्हणतो.

कबड्डीपटू राके श वायंगणकर यांच्याकडे रोज सहकु टुंब व्यायाम चालतो. त्यांची मुलगी हर्षिता राज्यस्तरीय मल्लखांबपटू आहे. ‘घरी मल्लखांब शक्य नसले तरीही व्यायाम के ल्याने आरोग्य चांगले राहते. शरीर सुदृढ असेल तर टाळेबंदीनंतर मल्लखांब खेळण्यात काहीच अडचण येणार नाही’, असे राके श सांगतात. नऊ वर्षीय श्लोक कालंडे राज्यस्तरावर स्के टिंग करतो. ‘टाळेबंदीनंतर सुरुवातीला स्के टिंगचा वेग कमी झालेला असेल, मात्र सरावाने पुन्हा वेग कमावता येईल’, असे तो सांगतो.