श्राद्ध, नारायण नागबळी आदी विधींसाठी अलाहाबाद, गया, वाराणसीतील गुरुजींकडून ऑनलाइनसोय

सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात नेहमीप्रमाणेच तृप्त झालेल्या कावळय़ांनी अनेकांच्या पानाकडे पाठ फिरवली आहे; तर अनेकांना गुरुजी मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागत आहे. तर काहींना नोकरी सांभाळून श्राद्ध करणे शक्य होत नाही. या सर्वावर तोडगा म्हणून अलाहाबाद, गया, वाराणसी या भागातील काही गुरुजींनी एकत्र येऊन पिंडदान, श्राद्ध, अस्थि विसर्जन, नारायण नागबळी यासारख्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या असून याला मुंबईसह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेमुळे यंदाच्या पितृपक्षात आभासी पिंडदानाचा नवा पायंडा पडल्याचे काही गुरुजींनी नमूद केले आहे.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

ज्या मंडळींना पितृपक्षात घरी श्राद्ध करणे शक्य नसते किंवा काही जण देश सोडून गेलेले असतात अशा सर्व अडल्या-नडल्यांच्या समस्येवर ऑनलाइन पिंडदान आणि श्राद्धाने यंदा तोडगा काढला आहे. यामुळे थेट अलाहाबाद येथील त्रिवेणी संगमावर आपला कोणताही वेळ न दवडता श्राद्ध किंवा पिंडदान करण्याचे समाधान आपल्याला मिळणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश तसेच बिहार येथील गुरुजींनी एकत्र येऊन व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या समाज माध्यमांसह संकेतस्थळे सुरू करून विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमध्ये अस्थि विसर्जनापासून ते नारायण नागबळीपर्यंत सर्व विधि केले जातात. हे विधी झाल्याची खात्री पटण्यासाठी हे गुरुजी आपल्याला स्काइप किंवा इतर व्हिडीओ कॉलिंग सेवांच्या माध्यमातून लाइव्ह पूजा दाखवितात किंवा जर इंटरनेट जोडणीमुळे ते शक्य झाले नाही तर पूजेचा व्हिडीओ आणि छायाचित्रेही पाठवतात. यामुळे आपण दिलेल्या पैशांतून खरेच धार्मिक कार्य झाल्याचे समाधान मिळणार आहे.

यंदाच्या पितृपक्षात आत्तापर्यंत काही हजार लोकांनी या ऑनलाइन सुविधांचा फायदा घेतला असून दर आठवडय़ाला किमान दहाजणांच्या अस्थि विसर्जनासाठी येत असल्याचे या संकेतस्थळाचे संचालक शशांक मिश्रा गुरुजी यांनी नमूद केले. ऑनलाइन श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी नोंदणी केल्यानंतर आपल्या मोबाइलवर एक यादी येते यात आपल्या आपले संपूर्ण नाव, ज्याचे श्राद्ध करायचे आहे त्याचे संपूर्ण नाव, कुटुंबात निधन झालेल्या सर्व पूर्वजांची नावे, गोत्र, निधनाचे कारण, ठिकाण, वेळ, तारीख या गोष्टी मागविल्या जातात. या संकेतस्थळावर अलाहाबाद किंवा वाराणसी येथे येऊन पिंडदान करणाऱ्यांसाठीही माहिती उपलब्ध करून दिली आहे. यामुळे या स्थळावर होणारी फसवणूक कमी झाल्याचे मिश्रा यांनी नमूद केले. तर यंदाचा प्रतिसाद पाहून इतरही गुरुजींच्या गटाने या सुविधा सुरू केल्या असल्याने यातही आता स्पर्धा सुरू झाली आहे.

श्राद्ध पॅकेज..

ऑनलाइन विधीनिहाय रक्कम आकारली जाणार आहे. रौप्य पिंडदान पॅकेजमध्ये २५०० रुपयांमध्ये पिंडदानाचा विधि केला जातो. सुवर्ण पिंडदान पॅकेजमध्ये ५१०० रुपयांमध्ये पिंडदानाबरोबरच ब्राह्मण भोजनही केले जाते. हिरक पिंडदान पॅकेजमध्ये ११००० रुपयांमध्ये पिंडदानाबरोबर ब्राह्मण भोजन, गोदान, अन्नदान आदी सुविधाही आहेत. ऑनलाइन पिंडदानासाठी तीन हजार रुपये आकारले जात असून यामध्ये विशेष व्हिडीओग्राफरचे दरही आकारले जातात. अस्थि विसर्जनासाठी दीड हजार रुपये आकारले जातात आणि त्यासाठी अस्थि कुरिअरने मागविल्या जातात.

ही ऑनलाइन सेवा मागच्या वर्षीपासून सुरू झाली असली तरी यंदा त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक प्रतिसाद दक्षिण भारत, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांतून मिळत आहे. प्रत्येक प्रातांनुसार हे धार्मिक विधि करण्यासाठी वेगवेगळे गुरुजी नेमण्यात आले आहेत.

– शशांक मिश्रा गुरुजी, संचालक, pitradev.com