भाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना  उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेने प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपाने प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आणले होते. निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच पालघर निवडणुकीत उतरली होती. त्यांनी भाजपाला चांगली लढत दिली. दरम्यान, भंडारा-गाेंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले. त्यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा दारूण पराभव केला.

UPDATES:

पालघरमधून भाजपाचे राजेंद्र गावित २९,५७२ मतांनी विजयी

– पालघर: भाजप- २,७२,७८२, शिवसेना- २,४३,२१०, बविआ- २,२२,८३८

– भंडारा-गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस- १.०२,०००, भाजप- ९४,८६८ मते

– पालघर २० वी फेरी: भाजप- २,६३,६८३, शिवसेना- २,३७,२०७, बविआ- २,०८,००९ मते

– पालघर १९ वी फेरी: भाजप- २,१४,०३०, शिवसेना- १,८८,३०७, बविआ- १,६१,१८२ मते

– भंडारा-गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस- ८५,१६०, भाजप- ८०,१३१ मते

– पालघर १७ वी फेरी: भाजप- २,०१,५०८, शिवसेना- १,७९,८०७, बविआ- १,५१,८९८ मते

– पालघर १६ वी फेरी : भाजप- १,७९,३४४, शिवसेना- १,५६,७५७, बविआ- १,३३,११४ मते

– भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेस- ६७,०६१, भाजपा- ६४,००७ मते

– पालघर १५ वी फेरी : भाजप- १,६६,१३८, शिवसेना- १,४७,४४१, बविआ- १,२४,९८५ मते

– गोंदियातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पिछाडीवर

– भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी आघाडीवर असली तरी प्रफुल्ल पटेल यांच्या भागात मात्र भाजपाने आघाडी घेतली आहे.

– पालघर १४ वी फेरी: भाजप – १,५५,६०८, शिवसेना – १,३६,५२२, बविआ – १,१६,०४५

– पालघर १३ वी फेरी: भाजप – १,४५,७५१, शिवसेना – १,२६,७४०, बविआ – १,०५,८४६

– पालघर १२ वी फेरी: भाजपा- १३४८८४, शिवसेना- ११५१४२, बविया- ९६१७७

– भंडारा-गोंदिया- राष्ट्रवादी ५१२१९, भाजपा- ४८३८२

– पालघर ११ वी फेरी: भाजपा- १२४१६६, शिवसेना- १०५६७७, बविआ- ८६५२३

– पालघर दहावी फेरी- भाजपाला ११३१८३, शिवसेना ९५७७२, बविआ ७८१८५, माकप ४०५४२ तर काँग्रेसला २४१२६ मते मिळाली

– पालघरमध्ये नवव्या फेरीनंतर भाजपाला ९१७९५, शिवसेना ७३३८७, बविआ ६२१८७, माकप ३५२७९, काँग्रेस १९९२० मते मिळाली आहेत.

– भंडारा-गोंदिया मतदारसंघात चाैथ्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला ३५५१२, भाजपा ३३३०६, भारिप ७७८ मते

– पालघरमध्ये सहाव्या फेरीअखेर भाजपा ७९ हजार, शिवसेना ६० हजार, बविआ ६३ हजार मते

– भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस १८०२८, भाजपा १७२४६, भारिप ७७८ मते

– भंडारा-गोंदियात चौथ्या फेरीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे ३१२३ मतांनी आघाडीवर

– सहाव्या फेरीअखेर पालघरमध्ये भाजपा आघाडीवर- भाजपा ५६८१२, शिवसेना ४२५७६, बविआ ४०३६२ मते

– पालघरमध्ये काँग्रेस पाचव्या स्थानी

– पालघरमध्ये पाचव्या फेरीतही भाजपा आघाडीवर- भाजपा ४४५८९, शिवसेना ३४२१८, बविआ ३२२९४, काँग्रेस ९१३१ मते मिळाली आहेत.

– भंडारा-गोंदियात तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे हेमंत पटले १ हजार मतांनी आघाडीवर

– भंडारा – गोंदिया मतदासंघामध्ये भाजप उमेदवार हेमंत पटले यांना ११०२३ तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना ७०८८ मते मिळाली असून भाजपा उमेदवाराला ३९०० मतांची आघाडी मिळालेली आहे.

– पालघर तिसरी फेरी- भाजपा ३५००० मते, बविआ ३०००० मते आणि शिवसेना २६००० मते

– भंडारा-गोंदियात तिसऱ्या फेरीची मतमोजणी होऊनही प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर नाही

– प्राथमिक माहितीनुसार भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपाचे हेमंत पटले आघाडीवर, राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे मागे

– पालघर दुसरी फेरी- भाजपाचे राजेंद्र गावित २३२७१ मते, बविआचे बळीराम जाधव १८९२३ मते, शिवसनेा १८५०५ मते, काँग्रेस ३४२२ मते, इतर १२१३१ मते

– पालघरमध्ये दुसऱ्या फेरीतही भाजपा आघाडीवर

– पालघरमध्ये पहिल्या फेरीत भाजपाचे राजेंद्र गावित आघाडीवर (११२३६ मते), बविआचे बळीराज जाधव (११०९० मते) दुसऱ्या स्थानी तर  शिवसेनेचे चिंतामणी वनगा (८१९० मते) तिसऱ्या स्थानी आहेत.

– पालघरमध्ये मतमोजणी केंद्रात प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये वादावादी

– डहाणूमध्ये राजेंद्र गावित २९५ मतांनी आघाडीवर

– पालघरमध्ये पोस्टल मतमोजणीत अडचणी आल्यामुळे थेट इव्हीएममधील मतमोजणीस सुरूवात

– बोईसरमध्ये शिवसेना हजार मतांनी आघाडीवर

– भंडारा-गोंदियामध्ये पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपा आघाडीवर

– भंडारा-गोंदियात १८ उमेदवार रिंगणात

– सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी १४ असे एकूण ८४ मोजणी टेबल मांडण्यात येणार. प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे ६०० अधिकारी – कर्मचारी तैनात

– पालघरमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून सूर्या कॉलनी येथे मतमोजणी सुरू होणार