मेट्रो रेल्वेच्या पुढील तिसऱ्या टप्प्यात विधानभवन स्थानकासाठी या परिसरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे स्थलांतर करावे लागणार आहे. या मेट्रो स्थानकासाठी कार्यालयांच्या स्थलांतरसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांनी दिले आहे. मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सर्व राजकीय पक्षांना एका नोटिसीद्वारे कार्यालयांचे स्थलांतर करण्याची सूचना केली होती.
अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आयोजित बैठकीत सहभागी झालेल्या १४ शासकीय आणि ६ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हे आश्वासन दिले. आता कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मेट्रो रेल्वे मार्ग अपेक्षित गतीने पूर्ण होणार आहे.