शीव स्थानकात तोतया तिकीट तपासनीसाला अटक

मुंबई : रेल्वेत कं त्राटी पद्धतीने काम करणारा हाऊसकीपर हा तिकीट तपासनीसाचे (टीसी) काम करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. शीव स्थानकात या तोतया टीसीला मध्य रेल्वे टीसींनी पकडले. त्याच्याविरोधात दादर लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नाव सुमित ठाकू र असे आहे. सॅण्डहस्र्ट रोड स्थानकातही एका तोतया टीसीला पकडण्यात आले आहे.

कुर्ला स्थानकात मुख्य तिकीट तपासनीस म्हणून काम करणारे सिकं दरजित सिंग हे शीव परिसरात राहतात. ते कुर्ला येथील काम संपवून सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता लोकलने शीव स्थानकात उतरले. फलाट क्र मांक दोनवरून जात असतानाच त्यांना सुमित ठाकू र हा तीन प्रवाशांना पकडून घेऊन जाताना दिसला. यात तीन जणांना तिकीट व पासची विचारणा करत असल्याचे सिंग यांच्या निदर्शनास आले. सिंग यांनी ठाकू र याला थांबवून तिकीट तपासनीस आहे का याची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या खिशात ओळखपत्र दिसले व त्याबाबतही विचारणा के ली असता मध्य रेल्वेत कामाला असल्याचे सांगितले.

सिंग यांनी ठाकू रला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. ते तिकीट तपासनीसाचे ओळखपत्र असल्याचे त्याने सांगितले. परंतु ओळखपत्र तपासले असता ते रेल्वेतील एका खासगी कंपनीच्या हाऊसकीपिंगचे असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात येताच ठाकू र आणि त्याने पकडलेल्या अन्य तीन प्रवाशांना घेऊन तात्काळ सिंग दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी के लेल्या चौकशीत सुमित ठाकू र चेंबूर येथे वास्तव्याला असल्याचे आणि तो मध्य रेल्वेत हाऊसकीपिंगचे काम करीत असल्याची माहिती समोर आली. लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

सॅण्डहस्र्ट रोड स्थानकातही कारवाई

सॅण्डहस्र्ट रोड स्थानकातही आणखी एका तोतया तिकीट तपासनीसाला पकडण्यात आले. मध्य रेल्वेचे तिकीट तपासनीस राजू गुर्जर सकाळी साडेनऊच्या सुमारास सॅण्डहस्र्ट रोड स्थानकात कार्यरत होते. लोकलमधून उतरलेल्या एका प्रवाशाकडे त्यांनी तिकिटाची विचारणा के ली असता त्याने आपण रेल्वेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याच्याजवळील ओळखपत्र तपासले असता त्यावर त्याचे नाव मुनीष डावरुंग व तो तिकीट तपासनीस असल्याचे नमूद होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवासाकरिता देण्यात येणाऱ्या एफआरसी पासची मागणी गुर्जर यांनी के ली. मात्र तो त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे गुर्जर यांना संशय आला व त्यांना ओळखपत्रही बनावट वाटले. पकडलेल्या प्रवाशाला सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडे नेण्यात आले व के लेल्या अधिक चौकशीत त्याने नाव मुनीष डावरुंग असल्याचे आणि भांडुप येथे राहणारा असल्याचे सांगितले. त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.