शेजाऱ्याच्या बायकोचे स्नानगृहातील चित्रीकरण केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बुधवारी सादाम शेख (३०) या टॅक्सी चालकाला जोगेश्वरीतून अटक केली. तक्रारदार महिला शेखच्या शेजारच्या घरात राहते. शेख आणि तक्रारदार महिलेच्या घरामध्ये एक भिंत आहे.
महिला स्नानगृहात असताना छप्पर आणि भिंतीच्या गॅपमध्ये लपवून ठेवलेला फोन महिलेच्या नजरेस पडला. तिने लगेच हा फोन ताब्यात घेतला व पोलिसांना याची माहिती दिली.
जोगेश्वरी बेहराम बागमध्ये आरोपी आणि तक्रारदार महिला राहते. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शेखला अटक केली असून त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 1:38 pm