डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याकडेच राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी दिला. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर न्यायालयाने हा निर्णय दिल्याची माहिती आनंदराज यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून पीपल्स सोसायटीवरील वर्चस्वावरून रिपब्लिकन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही सोसायटीवर आपला कायदेशीर दावा सांगितला होता. त्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी आठवले यांची अध्यक्षपदी निवड केली. हे सारे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.
प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले यांच्यातील वाद धुमसत असतानाचा बाबासाहेबांचे दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी २४ जूनला सोसायटीचा अचानकपणे ताबा घेतल्याने खळबळ उडाली. पुन्हा संघर्षांची शक्यता गृहित धरून फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. आनंदराज यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी थेट गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली होती.  त्या संदर्भात पोलिसांनी आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले व इतर संबंधितांविरुद्ध महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी होऊन सध्या सोसायटीचा ताबा ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडेच राहील, असा निर्णय न्यायालयाने  दिला. त्यानुसार सोसायटीचा ताबा आपल्याकडे ठेवण्यास न्यायालयाने मान्यता दिल्याचे आनंदराज यांनी सांगितले.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज