राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून शर्मा या मुस्लीमविरोधी लव-जिहाद या आधारहीन संकल्पनेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका केली आहे. दोन समुदायांत तेढ निर्माण करणाऱ्या आधारहीन लव-जिहाद या संकल्पनेला शर्मा या प्रोत्साहन देत आहेत. तसे करून त्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या आणि विवाहानंतरही आपल्या धर्माचे पहिल्याप्रमाणेच आचरण करणाऱ्या जोडप्यांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.