अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या (पॉलिटेक्निक) द्वितीय सत्रातील गणिताची (अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स) आणि प्रथम सत्राचा गणित (बेसिक मॅथेमॅटिक्स) हे दोन विषय वगळता एकाही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, असा खुलासा महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. विनोद मोहितकर यांनी केला. विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये. या संबंधात प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहेत. या चर्चा पोकळ आहेत, असा खुलासा त्यांनी केला. गणिताचे वर उल्लेखलेले पेपर वगळता आणखी कोणत्याही परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेळापत्रकातील बदल http://www.msbte.com/msbte_html/या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.