News Flash

रस्त्यांसाठी खस्ता सुरू!

पावसाळ्यात खड्डे व त्यानंतर रस्त्यांची कामे यात सामान्य मुंबईकर भरडला जातो. त्या

मुंबईतील ३०५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात; वाहतूक मार्गात बदल, वाहनांची वाट अरुंद

खड्डय़ांच्या नावाने खडे फोडत अख्खा पावसाळा काढणाऱ्या मुंबईकरांना आता चांगल्या रस्त्यांसाठी आणखी काही काळ खस्ता खाव्या लागणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना ‘करून दाखवले’ असे सांगण्यासाठी मुंबईभर तब्बल ३०५ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना बदललेले वाहतूक मार्ग आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी कोंडी यांना सामोरे जावे लागणार आहे. अर्थात रस्त्याची ही कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन खबरदारी घेत असून कंत्राटदारांना कामांच्या ठिकाणी काम सुरू होण्याची व पूर्ण होण्याची तारीख नमूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात खड्डे व त्यानंतर रस्त्यांची कामे यात सामान्य मुंबईकर भरडला जातो. त्यातच यावर्षी एकूण ३४० किलोमीटर लांबी असलेल्या तब्बल १००४ रस्त्यांच्या कामांना पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला. या रस्त्यांपैकी सर्वाधिक कामे पश्चिम उपनगरात आहेत. शहराच्या दक्षिण भागात २०५ रस्ते व ५९ चौक, पूर्व उपनगरात २७४ रस्ते आणि १९ चौक, तर पश्चिम उपनगरात ४०३ रस्ते व ४५ चौकांमधील दुरुस्ती किंवा नव्याने रस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्याचे महानगरपालिकेने ठरवले. या रस्त्यांमुळे शहरातील ६३ किलोमीटर, पूर्व उपनगरातील ८७ किलोमीटर तर पश्चिम उपनगरातील १९० किलोमीटर लांबीचे रस्ते खणले जाणार होते. मात्र हे सर्व रस्ते एकाच वेळी खणले तर आधीच वाहतूक लकवा झालेल्या या शहरात गहजब होईल याची कल्पना असल्याने वाहतूक पोलिसांनी तीन टप्प्यात कामांना परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरात ११० किलोमीटर लांबीच्या ३०५ रस्त्यांवर कामे सुरू आहेत.

पश्चिम उपनगरातील १३४, पूर्व उपनगरातील ८८, तर दक्षिण शहरातील ८३ रस्त्यांचे काम पालिकेकडून सुरू झाले आहे. यात अनेक प्रमुख रस्त्यांचाही समावेश असल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे तर काही ठिकाणी रस्त्यांचा काही भाग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचा आढावा बुधवारी परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी सर्व सात परिमंडळांच्या उपायुक्तांनी कामाच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन कामांची गुणवत्ता व गती पाहावी व उणिवा आढळल्यास तातडीने रस्ते विभागाच्या प्रमुखांना कळवाव्यात, अशा सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्या.

या रस्त्यांचे काम सुरू..

पूर्व उपनगरांमध्ये कोहिनूर रुग्णालय मार्ग, लल्लूभाई कंपाऊंड मार्ग, घाटकोपर मानखुर्द िलक रोड यासारख्या मार्गाचा समावेश आहे. पश्चिम उपनगरांमध्ये स्वामी विवेकानंद मार्ग, ना. सी. फडके मार्ग, श्रद्धानंद मार्ग, वीरा देसाई मार्ग, तर दक्षिण भागात बॅरिस्टर नाथ प मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, रजनी पटेल चौक, सिद्धिविनायक चौक, न. चिं. केळकर मार्ग, प्रबोधनकार ठाकरे मार्ग यासारख्या महत्त्वाच्या मार्गावर काम सुरू आहे.

यावर्षी काम करण्यासाठी मंजूर झालेले रस्ते 

  • शहर – २०५ रस्ते – ५९ चौक – ६३ किलोमीटर
  • पश्चिम उपनगरे – ४०३ रस्ते – ४५ चौक – १९० किलोमीटर
  • पूर्व उपनगरे – २७४ रस्ते – १९ चौक – ८७ किलोमीटर
  • एकूण – ८८२ रस्ते – १२३ चौक – ३४० किलोमीटर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 3:21 am

Web Title: potholes work started in mumbai
Next Stories
1 चर्चगेटहून ठाण्याला लोकल सोडता येईल?
2 बायको चुकली.. स्टॅण्डवर!
3 हार्बरकरांचा प्रवास हवेशीर होणार
Just Now!
X