पालिकेच्या रुग्णालयांतील करोना रुग्णांसाठी दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्याचा पालिके चा विचार असून रेमडेसिवीर जादा दराने खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या एका नगरसेवकाने केला आहे. दोन लाख इंजेक्शनसाठी पालिका ३० कोटी खर्च करणार आहे. प्रत्यक्षात ही खरेदी १३ कोटींमध्ये व्हायला हवी असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी के ला असून त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी के ली आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिले जात असल्यामुळे पालिके ने ७ एप्रिल रोजी दोन लाख इंजेक्शनसाठी निविदा काढल्या. प्रत्येक इंजेक्शनसाठी १,५६८ रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारच्या हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशनने देखील ५७,१०० इंजेक्शन खरेदी करण्यासाठी ९ एप्रिलला  निविदा काढल्या होत्या. मात्र त्यात त्याचा दर ६६५ रुपये ग्राह््य धरण्यात आला आहे. त्यामुळे पालिका या इंजेक्शनसाठी अडीचपट जादा पैसे खर्च करत असल्याचा आरोप मिश्रा यांनी के ला आहे. तसेच यापूर्वी पालिके ने मार्च महिन्यात ५० हजार इंजेक्शन खरेदी के ली होती. तेव्हा त्याचा दर ६५० रुपये प्रति इंजेक्शन होता. तसेच गेल्याच आठवड्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची किं मत ११०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान असावी असे निर्देश दिले होते. त्याचाही दाखला मिश्रा यांनी आपल्या पत्रात दिला आहे.

दरम्यान, पालिके ने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत सर्व नियम धुडकावले असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला आहे. पालिके ने निविदा उघडण्याआधीच एका खासगी कं पनीकडून इंजेक्शन खरेदी के ल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा औषध घोटाळा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.