मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय सुचवले जात असले, तरी रेल्वे सुरक्षा दलाने एक छोटा उपाय करून या अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. ९ डिसेंबपर्यंत दिवसाला सरासरी १० मृत्यू होत असलेल्या मुंबईच्या रेल्वेमार्गावर त्यानंतर हे प्रमाण सरासरी सातवर येऊन थांबले आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने संवेदनशील ठिकाणी कर्मचारी तैनात करून मोठय़ा प्रमाणात कारवाई सुरू केली असून डिसेंबर महिन्यात केवळ मध्य रेल्वेवर ४२००हून अधिक जणांवर कारवाई झाली. रेल्वे सुरक्षा दलाने हा कारवाईचा जोर मध्य रेल्वेवर नव्या वर्षांतही कायम ठेवला असून केवळ २० दिवसांत तब्बल ८५० जणांना त्याचा फटका बसला आहे.

‘भावेश नकाते अपघात प्रकरणा’नंतर उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या मृत्यूंबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १५ डब्यांच्या लोकल, उन्नत रेल्वेमार्ग, आसनव्यवस्थेत बदल असे अनेक कल्पक उपाय सुचवले आहेत. मात्र या अपघातानंतर दोनच दिवसांत, ९ डिसेंबरपासून रेल्वे सुरक्षा दलाने मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली.

मध्य रेल्वेने डिसेंबरमध्ये ४२९२ जणांवर कारवाई करत त्यांना रेल्वे रूळ न ओलांडण्याबद्दल समज दिली. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या ११ महिन्यांत मिळून फक्त ३६६३ जणांवर कारवाई झाली होती. त्यामुळे एका महिन्यात एवढी मोठी कारवाई झाल्याने अपघातांना चांगलाच आळा बसला. रेल्वेमार्गावर दरमहा साधारण ३०० ते ३५० मृत्यू होतात. मात्र डिसेंबर महिन्यात हा आकडा २१३ एवढाच होता. त्यातही ९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत फक्त १६४ मृत्यू झाले. जानेवारी महिन्यातही रेल्वे सुरक्षा दलाने हा कारवाईचा जोर कायम ठेवला असून केवळ २० दिवसांत ८४७ जणांवर कारवाई केली आहे. त्यापैकी २० जणांना कशाळा, महाविद्यालयांच्या

सुरक्षा समितीत आता पोलीसहीोरावासाची शिक्षाही झाली आहे. या २० दिवसांत १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे सरासरी सात जण दर दिवशी मृत्युमुखी पडत आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल अधिक प्रयत्नशील राहील, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.

महिना                    मृत्यू       कारवाई

डिसेंबर                   २१३         ४२९२

जाने. १ ते २०         १४२           ८४७