रेल्वे आरक्षणाची मुदत १२० दिवसांवरून पुन्हा ६० दिवसांवर आणण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. १ मेपासून रेल्वे गाडय़ांचे आरक्षण ६० दिवसच अगोदर करता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने पूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी ६० दिवसांची मुदत प्रथम ९० आणि नंतर १२० दिवस केली होती. तथापि, तिकिटांचा काळाबाजार होऊ लागल्यामुळे आरक्षणाची मुदत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी आरक्षणाची मुदत कमी करण्याची घोषणा केली. ३० एप्रिलपर्यंत मात्र १२० दिवसांपर्यंतच्या गाडीचे आरक्षण करता येणार आहे.