07 August 2020

News Flash

रेल्वेची भिंत कोसळून महिला ठार

भायखळा रेल्वे स्थानकानजीक असलेली संरक्षक भिंत कोसळून एक महिला ठार झाली़ तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर एन. एम.

| December 7, 2012 06:41 am

भायखळा रेल्वे स्थानकानजीक असलेली संरक्षक भिंत कोसळून एक महिला ठार झाली़  तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर एन. एम. जोशी मार्गावर रेल्वेने संरक्षक िभत बांधली होती. अनेक जण या भिंतीचा आश्रय घेऊन झोपडय़ा बांधून बेकायदा राहात होते. गुरुवारी दुपारी अचानक ही भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढले. मात्र अपघातात नसीब उल अन्सारी (२२) या तरुणीचा मृत्यू झाला, तर मुस्तफा शेख (५०) आणि रियाज शेख (३०) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2012 6:41 am

Web Title: railway compound wall collapsed lady killed
टॅग Railway
Next Stories
1 शुक्रवार ठरणार ‘भाजीवार..
2 देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मध्यमवर्गीयांनी राजकारणात यावे-पर्रिकर
3 ‘मी पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावे, ही तर कार्यकर्त्यांची इच्छा’
Just Now!
X